जळगाव मिरर | १५ मार्च २०२४
बॉलिवूडचे ‘महानायक’ अमिताभ बच्चन यांना कोकिलाबेन रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. अमिताभ बच्चन यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. अमिताभ बच्चन यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्याचे वृत्त कळताच त्यांचे चाहते चिंतेत आले आहेत. अमिताभ बच्चन यांचे चाहते आणि सेलिब्रिटी त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी ६ वाजता अमिताभ बच्चन यांना मुंबईतल्या कोकिलाबेन रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर अँजिओप्लास्टी सर्जरी करण्यात आली. अमिताभ बच्चन यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्याचे वृत्त कळताच चाहते चिंतेत आले आहेत. सध्या सर्वजण त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत. अमिताभ बच्चन यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असले तरी देखील अद्याप त्यांच्या कुटुंबीयांकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली आहे
अमिताभ बच्चन यांनी काही वेळापूर्वी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, ‘सदैव कृतज्ञता व्यक्त करतो.’ अमिताभ बच्चन यांनी अँजिओप्लास्टी सर्जरीनंतर ही पोस्ट केली असल्याचे म्हटले जात आहे.
बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन हे नेहमी आपल्या चित्रपटांमुळे चर्चेत असतात. ८१ व्या वर्षी देखील ते काम करत आहेत. अजूनही अनेक चित्रपटांमध्ये आणि ‘कौन बनेगा करोडपती’ हा शो ते होस्ट करत आहेत. अमिताभ बच्चन यांचा फक्त भारतामध्ये नाही तर जगभरामध्ये मोठा चाहतावर्ग आहे. त्यांच्या नवनवीन चित्रपटांसाठी त्यांचे चाहते खूपच उत्सुक असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहतात. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर ते नेहमी नवनवीन पोस्ट शेअर करतात.




















