
धरणगाव : प्रतिनिधी
येथून जवळ असलेल्या आज दुपारी चोपडा रोडवरील पिंपळे गावाच्या फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात दोन तरुण जागीच ठार झाले आहेत.हे दोन तरुण कामानिमीत्त सकाळी धरणगावहुन चोपडा येथे गेल्याचे समजते. घरी येत असताना हा अपघात झाला आहे.
सविस्तर वृत्त असे की, चोपड्याहून धरणगावकडे परत येतांना पिंपळे गावाच्या फाट्याजवळ असलेल्या नायरा पेट्रोल पंपाच्या वळणावर दुचाकी (क्र. एमएच.१९ सीएच ३८९४) झाडाला धडकली. अपघात इतका भीषण होता की, एकाची कवटीच फुटली तर दुसऱ्याच्या पायाचे तीन तुकडे झाले आहेत. शहरातील संजय नगर भागातील रहिवाशी असलेले प्रदीप पाटील (वय२४) आणि किशोर पाटील (वय ३२) हे दोघं आज कामानिमित्त चोपडा येथे गेलेले होते. दुपारी अपघाताची माहिती मिळताच संपूर्ण शहरातील राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम करणारे मंडळी ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले होते. (बातमी अपडेट होत आहे)




















