
जळगाव मिरर । ६ जानेवारी २०२३
जळगावात गेल्या काही महिन्यापासून महामार्गावर अपघाताची मालिका संपता संपत नाही. अशातच आज दि ६ रोजी दुपारच्या सुमारास टॅक्टर व दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात एक तरूण ठार झाल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार शहरातील खोटे नगरहून बांभोरी जाणाऱ्या महामार्गावर दुचाकी क्र.एम.एच.१९.बी.पी.२३५५ याने एका महाविद्यालयात पेपर देण्यासाठी जात असलेल्या दोन मित्रांच्या दुचाकीचा व टॅक्टरचा भीषण अपघात झाला कि, ३० वर्षीय तरूण प्रश्नात भागवत कोळी (वय ३०) गवखेडा ता.रावेर हा जागीच ठार झाला आहे. याला तत्काळ जिल्हा रुग्णालयात आणले असता त्याला सीएमओ दीपक जाधव यांनी मयत घोषित केले आहे. तर दुसरा मित्र जयेश द्वारकानाथ पाटील(वय २३) गवखेडा ता.रावेर हा जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. हा अपघात इतका भीषण होता कि, टॅक्टरहि पलटी झाले आहे तर दुचाकी हि रस्त्यावर फेकली जावून तरुणाचे छिन्न विछिन्न अवस्थेत तरूण होता. घटनास्थळी तालुका पोलीस स्थानकाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी दाखल झाले होते.




















