
जळगाव मिरर | १४ मे २०२४
राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताच्या भीषण घटना घडत असतांना अशीच एक धक्कादायक घटना नांदगाव – छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर घडली आहे. बस आणि मारुती कारचा अपघात झाला असून यात मारुती कारमधील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन वर्षांचे बालक गंभीर झाले आहे.
सविस्तर वृत्त असे कि, नांदगाव – छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील गंगाधरी येथे मनमाड आगाराची बस चाळीसगावहून मनमाडकडे येत असताना बस आणि मारुती कारची जोरदार धडक झाली. अपघातात तीन जण जागीच ठार झाले. तर एक दोन वर्षीय बालक गंभीर जखमी झाले.मृतांमध्ये दोन महिला व एका पुरुषाचा समावेश आहे. बस चालकाच्या चुकीने हा अपघात घडल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. ओव्हरटेक करण्याचा नादात कारला समोरून जोरदार धडक दिल्याचे प्रवाशांचे म्हणणे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे.




















