जळगाव मिरर | १० डिसेंबर २०२४
दुचाकी वेडीवाकडी चालवून पोलिसांचे बॅरिकेटस घेवून जाणाऱ्या वाहनावर धडकून जखमी झालेल्या ईश्वरसिंग मिहेरसिंग टाक (वय ३५, रा. सदगुरू नगर) यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, सिंधी कॉलनीकडून शहराकडे बॅरिकेट्स घेवून जाणारे पोलिस दलाचे वाहन (एमएच १९, एम ९२१४) हे पांडे डेअरी चौकाकडे जात होते. त्यावेळी ईश्वरसिंग टाक व त्यांचा भाऊ नेपालसिंग मिहेरसिंग टाक (३६) हे दोघे भाऊ दुचाकीने (एमएच १९, टी ६८१८) सिंधी कॉलनीकडे जात असताना त्यांची दुचाकी पोलिसांच्या वाहनावर धडकली. यात दोन्ही भाऊ गंभीर जखमी झाले होते. गंभीर जखमी झालेल्या ईश्वरसिंग टाक यांच्यावर गोदावरी रुग्णालयात उपचार सुरु असतांना सोमवार दि. ९ रोजी त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.