
जळगाव मिरर | २१ ऑक्टोबर २०२३
सध्या सोशल मिडीयावर लाईकचा पाऊस पाडण्यासाठी अनेक लोक काय युक्ती लढवतील सांगता येत नाही तर काही तरुण तरुणी देखील यात मागे नाही. नको ते जीवघेणे स्टंट करत असतात. ज्यामुळं अनेकदा मोठ्या दुर्घटनाही घडतात. सध्या असाच एक हौशी तरुणीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका तरुणीला बाईकची स्टंटबाजी चांगलीच महागात पडल्याचं दिसत आहे.
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, रस्त्यावर वाहंनाची वर्दळ असताना तरुणी बाईक चालवताना स्टंट करत आहे. तरूणीनं टी-शर्ट आणि जीन्स घातली आहे. स्टंटसाठी तरूणी बाईकच्या सीट बसून अगदी बाईक वाकडी-तिकडी चालवत आहे. आसपासच्या बाकी गाड्यांना कट ही मारत असल्याचं दिसत आहे. त्यावेळी तिचा बॅलन्स चुकूनही बिघडला तर जीवावर बेतु शकत हेही तिला समजत नाही. परंतू तिचा हा शहानपणा तिला नडतोच. तिच्या या ड्रायव्हिंगमुळं मागुन येणाऱ्या गाडीला धक्का लागतो आणि त्या गाडीवरील दोघंजणखाली पडतात. परंतू तरी तरूणी अपघात झाल्यानंतर तशीच निघून जाते.
खुद तो पंछी बन के गगन में उड़ रही है पीछे वाली को गटर में डाल दीया🙆♀️😲 pic.twitter.com/mkrRftbj0Y
— HasnaZarooriHai🇮🇳 (@HasnaZaruriHai) October 19, 2023
@HasnaZaruriHai या ट्वीटर काउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय. बाइक, स्कुटी किंवा कार चालवताना मुली किती घाबरतात हे अनेक व्हिडीओमध्ये दिसतं. त्यामुळं तरूणीच्या ड्रायव्हिंगबाबतचे गंमतीदार व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्याच्यां चुकीच्या ड्रायव्हिंगमुळं अपघात ही होतात. पण व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतील तरूणी अगदीच बिनधास्त दिसत आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. अशा मुर्खांवर कारवाई करण्याची मागणी काही नेटकऱ्यांनी केली आहे. आणखी एका यु्र्जरंन म्हटल आहे की, स्वतः पक्ष्यासारखी आकाशात उडतेयं, अणं मागे असलेल्याला गटारात फेकून दिते. अशा गंमदीर ही प्रतिक्रीया नेटकऱ्यांनी केल्यात. तर काही जणांनी वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या आणि असे जीवघेणे स्टंट करणाऱ्यांच वाहन परवानेच रद्द करायला हवेत असाही सल्ला दिला आहे.