
मुंबई : वृत्तसंस्था
रक्षाबंधन हा सण बहीण भावाच्या पवित्र नात्याचा सण राज्यात सर्वत्र साजरा होत आहे. आज सर्वच भावना टेन्शन असते कि आपल्या लाडक्या बहिणीला द्यावे तरी काय व आताच्या महागाईमध्ये असे कोणते गिफ्ट द्यावे कि बहीण खुश होईल. त्यात बहिणी भरपूर असतील तर कित्येक भावांना आपला खिसा रिकामा होणार याचीच चिंता असते. त्यामुळे कमीत कमी किमतीत असं काय बेस्ट गिफ्ट देता येईल ज्यामुळे बहिणीही खूश होतील, याचा शोध सुरू होतो. अशाच एका कंजूस भावाने बहिणींच्या गिफ्ट्सचा जबरदस्त जुगाड केला आहे.
https://www.instagram.com/tv/Cg0-C2SDep4/?utm_source=ig_web_copy_link
रक्षाबंधनच्या निमित्ताने सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. एका भावाने आपल्या बहिणींच्या गिफ्टसाठी बजेट तयार केलं आहे. फक्त 80 रुपयांत त्याने आपल्या 6 बहिणींसाठी गिफ्टची तयारी केलीच पण सोबत याच पैशात त्याने एक्स्ट्रा सातवी बहीण अचानक आली त्याचीही तरतूद करून ठेवली आहे.
व्हिडीओत पाहू शकता एका कागदावर या भावाने आपल्या बहिणींची नावं, त्यांना दिलं जाणारं गिफ्ट्स आणि त्याची किंमत लिहिली आहे. त्यानंतर कॅल्युलेटर घेऊन त्याने त्या सर्व गिफ्ट्सची टोटल केली. तर ती फक्त 80 रुपये आहे. म्हणजे 6 बहिणींसाठी जिथे हजारो रुपये जाणार होते, तिथं फक्त शंभरच्या एका नोटेत या भावाने उरकून टाकलं. आता हे कसं शक्य आहे असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल नाही का? हे गिफ्ट असं आहे तरी काय? हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला नक्कीच असेल.
या भावाने स्वतःची सख्खी बहीण, आत्याची मुलगी, काकीची मुलगी, शेजारील राहणारी काकीची मुलगी, शाळा आणि ट्युशनमधील बहीण अशा एकूण सहा बहिणींचा उल्लेख केला आहे. ज्यात काहींना त्याने कॅश आणि काहींना गिफ्ट्स म्हणून चॉकलेट दिलं आहे. यात आणखी एखादी बहीण अॅड झालीच तर तिच्यासाठीही एक चॉकलेट काढून ठेवलं आहे.




















