जळगाव मिरर / १८ फेब्रुवारी २०२३ ।
शिवजयंतीच्या निमिताने जिल्हा एकता मराठा फाउंडेशनतर्फे २२ फेब्रुवारी पासून शिवतीर्थ मैदानावर मराठा क्रिकेट लिग स्पर्धा सुरू होत असून २६ रोजी समारोप होणार आहे. या निमित्त दरवर्षी विशेष कार्यक्रम आयोजिला जातो. या अंतर्गत स्वर्गरथाचे लोकार्पण, समारोपाच्या दिवशी हभप. इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन असे कार्यक्रम ठेवले असल्याची माहिती पत्रकार परिषदेत प्रा. गोपाल दर्जी यांनी दिली.
यावेळी पत्रकार परिषदेत जळगांव जिल्हा एकता मराठा फाऊंडेशनचे अध्यक्ष विनोद सोनवणे, कार्याध्यक्ष गोपाल दर्जी, सचिव सागर पाटील, सदस्य सचिन पाटील, आबासाहेब पाटील, सुनील सोनवणे, दीपक आर्डे यांची उपस्थिती होती.
या स्पर्धांचे प्रायोजक आ.मंगेश चव्हाण हे असून को-प्रायोजक म्हणून प्रा. गोपाल दर्जी, विनोद सोनवणे हे आहेत. उद्घाटन २२ रोजी सायंकाळी होणार असून स्थानिक लोकपं्रतिनिधींच्या हस्ते होणार असून २६ रोजी हभप. इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनाने समारोप होणार आहे. यात एकूण ४७ सामने होणार अहेत. ८ ओव्हरचा सामना असेल. यात संघाना मोफत प्रवेश आहे. एकूण २४ संघ सहभागी आहेत. मैदानात प्रवेश करतांना किल्ल्यांचा देखाव्याची सजावट केली जाणार आहे. डे नाईट व टेनिस बॉलचे हे सामने होतील व राज्य पातळीवर सामने होतील यात महाराष्ट्रासह गुजराथ, मध्य प्रदेश, गुजराथ अशा विविध राज्यातील संघ सहभागी होतील. पहिले बक्षिस १ लाख, दुसरे बक्षीस ५१ हजार तर मॅन ऑफ दीमॅच खेळाडूला एक बॅट दिली जाईल. खेळाडूंचा १ वर्षाचा विमा काढण्यात येणार आहे.
