जळगाव मिरर । ९ ऑक्टोबर २०२५
बोगस कॉल सेंटरमधून ज्या विदेशी नागरिकांची फसवणूक झालेल्यांसोबत पोलिसांकडून संपर्क केला जात आहे. तसेच ज्यांची फसवणुक झाली आहे त्यांनी याबाबत काही तक्रार केली आहे का?, याची माहिती संकलीत करीत आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारावर भारतीय दूतावास हे विदेशातील दूतावासाच्या माध्यमातून संपर्क साधून माहिती जाणून घेत आहे. तसेच या प्रकरणातील संशयित माजी महापौर ललित कोल्हे (रा. कोल्हे नगर) व राकेश चंदू अगारिया (रा. वाघ नगर) या दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यांची नाशिक कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरापासून काही अंतरावर असलेल्या माजी महापौर ललित कोल्हे यांच्या फार्म हाऊसवर बोगस कॉल सेंटर सुरु होते. याठिकाणाहून आपण नामांकीत कंपन्यांचे प्रतिनिधी असल्याचे सांगण्यासह वेगवेगळे अमिष दाखवून इंग्लंड, अमेरिका, कॅनडा, युरोप यासह अन्य देशांमधील नागरिकांची आर्थिक फसवणूक केली जात होती. या कॉलसेंटवर पोलिसांनी छापा टाकून तेथून ३२ लॅपटॉप पोलिसांनी जप्त केले होते. या कारवाईनंतर तपासात पोलिसांनी कॉल सेंटरमधून विदेशात तब्बल ६७ कॉल, तर कोल्हेंच्या मोबाईलवरुन १८ कॉल झाल्याची माहिती पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे. तसेच पोलसिांनी विविध मुद्यांवर माहिती संकलित केली असून एकूण फसवणुकीचा आकडा व फसवणूक झालेल्यांची माहिती देखील घेतली जात आहे.
कॉल सेंटर प्रकरणातील मुख्य सूत्रधार हे विदेशात पळून जावू नये याकरीता लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली. याबाबत देशातील सर्व विमानतळांना याविषयी माहिती देण्यात आल्याने ते विमानतळावर पोहचताच अलर्ट मिळणार असून तिघांचे विदेशात जाण्याचे मार्ग पोलिसांनी बंद केले आहे. कॉल सेंटरमधून ज्यांची फसवणुक झाली ते सर्व विदेशातील आहे. त्यामुळे त्यांच्यांसोबत संपर्क करण्यास पोलिसांना अनेक अडथळे येत आहे. पोलिसांकडून इतर यंत्रणांच्या माध्यमातून कॉल सेंटरच्या माध्यमातून ज्यांच्यासोबत संपर्क झाला आणि त्यांची फसवणुक झाली आहे का याची माहिती संकलीत केली जात आहे. तसेच आता या फसवणूक झालेल्या नागरिकांनी त्या-त्या देशातील पोलिसांकडे काही तक्रारी दिल्या आहेत का, याचीही माहिती घेतली जात आहे. त्याकरीता भारतीय दूतावास हे त्या देशातील दूतावासासोबत संपर्क साधून माहिती जाणून घेत आहे.
या प्रकरणात पोलिस कोठडीची मुदत संपल्याने ललित कोल्हे व राकेश अगारिया यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिस कोठडीचा हक्क राखून पोलिसांनी न्यायलयीन कोठडीची मागणी केली. न्यायलयाने दोघांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. जळगाव कारागृहात जागा नसल्याने दोघांनाही नाशिक कारागहात हलविण्यात आले.




















