जळगाव मिरर | १३ मार्च २०२५
पहूर येथील जामनेर रस्त्यावर असलेल्या रेल्वे फाटकाजवळ जामनेरहून पहुरकडे येणारी हुंदाई कार उलटली. यात चालकास दोन जण जखमी झाल्याची घटना आज रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली.
सविस्तर वृत्त असे कि, जामनेरकडून छत्रपती संभाजी नगरकडे जाणारी हुंदाई कार (एमएच ०३, बीएस-४५२६) ही जामनेर रस्त्यावर असलेल्या रेल्वे फटकाच्या पुढे रस्त्याच्या बाजूला उलटली. या अपघातात छत्रपती संभाजी नगरमधील वाळूज परिसरातील संदीप एकनाथ बर्डे व विशाल रामटेके हे जखमी झाल्याची घटना आज रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, या घटनेनंतर रस्त्यावर पोलीस भरतीसाठी व्यायाम करणाऱ्या तरुणांनी अपघातातील जखमींना कारमधून बाहेर काढून दुचाकीवरून पहुर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तेथे प्राथमिक उपचार करून त्यांना जळगाव येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.