
जळगाव मिरर । ८ जानेवारी २०२३
शहरातील एका परिसरातून चारचाकी चोरीस गेल्याची घटना दिनांक ५ रोजी उघडकीस आली आहे याप्रकरणी जळगाव शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, शहरातील शाहूनगर परिसरातील नक्षत्र बिल्डिंगच्या जवळील रहिवासी जितेंद्र कैलास मुळीक यांच्या मालकीची तवेरा कार क्रमांक एम.एच.19.डीजे.00५७ या क्रमांकाची चार चाकी सुमारे १ लाख ८० हजार रुपये किमतीची दिनांक 4 जानेवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली असल्याची घटना दिनांक ५ रोजी सकाळी उघडकीस आली आहे. याप्रकरणी जितेंद्र मुळीक यांनी दिनांक ७ जानेवारी रोजी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यान विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.प्रफुल धांडे हे करीत आहे




















