जळगाव मिरर । २६ नोव्हेबर २०२२
राज्यातील मुख्यमंत्री शिंदे हे आपल्या आमदारांना घेवून गुवाहाटीत असतांना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी बुलढाणा येथील शेतकरी मेळाव्या उपस्थिती दिली होती. यावेळी ते बोलताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटावर जोरदार टीकास्त्र सोडलं.
काही जुने चेहरे दिसत नाहीत. नितिन देशमुख चांगले शिवसैनिक आहेत, ते परत आले. आज सगळे “काय झाडी काय डोंगर सगळे ओक्के”. ते तिकडे आशीर्वाद घ्यायला गेले, मी जिजाऊंचे आणि तुमचे आशीर्वाद घ्यायला आलोय. काही गेलेत, नितिन आहे, विनायक राऊत आहेत, अरविंद सावंत आहेत. मी पुन्हा त्वेषाने उभा आहे, मी पुन्हा जोमाने उभा आहे आणि मी जिंकणार म्हणजे जिंकणारच. इथल्या ताई मोठ्या हुशार थेट पंतप्रधानांना राखी बांधली फोटो छापून आणला. ही चालूगिरी लोक बघत नाहीयत. भाजप आज आयात पक्ष आहे. यादी काढा मग समजेल किती आयात लोक आहेत. आजही गद्दारांनी सांगावे आम्ही भाजपाच्या टिकिटावर लढणार नाही. त्यांना बाळासाहेब हवेत, चिन्ह हवे मग तुमची मेहनत कुठे आहे? ३. छत्रपतींचा वारंवार अपमान करायचा. गुजरात निवडणुकीसाठी उद्योग तिकडे पाठवत आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री आपल्या राज्यातला गावांवर हक्क सांगत आहेत. पुढल्या वर्षी कर्नाटकची निवडणूक आहे. उद्या भाजप महाराष्ट्राचे तुकडे करेल तरीह मिंधे गप्प बसतील. विठोबाला पण कर्नाटकात नेणार, अक्कलकोटचे स्वामी समर्थ तिकडे नेणार. मी मुख्यमंत्री असताना राज्यपालांचा आगाऊपणा सहन केला नाही. काळ्या टोपीने अनेकदा अपमान केला. काल अमित शहा बोलले आम्ही धडा शिकवला. पण बाबरी पाडल्यावर शिवसेना उभी राहिली, अमरनाथ यात्रेवेळी शिवसेनाप्रमुख उभे राहिले. आमच्या दैवताचा पुराने आदर्श म्हणून उल्लेख करतात. सत्तारांनी सुप्रिया सुळेंचा अपमान केला. मी मुख्यमंत्री असतो तर लाथ घालून हाकललं असतं. महाराष्ट्राचा अपमान होतोय, देवतांचा अपमान होतोय तुम्ही सहन करता हे असले बाळासाहेबांचे विचार नाहीत.
