जळगाव मिरर | ४ जुलै २०२४
स्वायत्त जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयामधील (एमबीए) मास्टर ऑफ बिजनेस ऍडमिनिस्ट्रेशनचा विद्यार्थी प्रमोद बाविस्कर याची ‘उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक’मध्ये निवड झाली असून या पदासाठी सुमारे साडे अकरा लाखांचे पॅकेज मिळाले आहे. तसेच अभियांत्रिकीतील आर्टिफिशियल इंटेलिजन्स विभागातील शशी खंडागळे या विध्यार्थ्यानीची देखील ‘प्लॅनेट स्पार्क’ या मानांकित कंपनीत निवड झाली असून या विध्यार्थिनीला सहा लाखांचे पॅकेज मिळाले आहे.
जी. एच. रायसोनी महाविद्यालयातील विविध विद्या शाखांमधील विद्यार्थ्यांची एका पाठोपाठ एक नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीसाठी निवड होत असल्यामुळे पालक व विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून महाविद्यालयातील ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभाग उत्कृष्ट नियोजन करीत विद्यार्थ्यांच्या विविध तांत्रिक सॉप्ट स्किल्सवर विशेष भर देऊन विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनविण्यात अत्यंत महत्वाची भुमिका बजावत असते. याच अनुषंगाने विविध आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनींनी घेतलेल्या मुलाखतीत जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली आहे. अशी माहिती जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी दिली.
एशियन पेंट्स, इंडिया मार्ट, उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक, कोटक महिंद्रा बँक, फ्लॅश इलेक्ट्रॉनिक प्रायव्हेट लिमिटेड, नेक्स्ट जनरेशन डिजिटल सोल्युशन यासारख्या विविध आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपनीच्या निवड समितीने जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालयामधील भावेश कासारे, नीरज पाटील, हितेश पाटील, यश फुले, विधी गोयदानी, तेजस्विनी जयस्वाल, वैष्णवी पाटील, प्रशांत तिरमाळे, आनंद पवार, प्रज्वल मंडलिक, गौरव पाटील, सूर्यकांत खंडारे, निशा पवार, दिशा हरहारे, अक्षय कासार, गौरव पाटील व दीप्ती जाधव या विद्यार्थ्यांची मोठे पॅकेज देवून निवड केली. विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये रायसोनी महाविद्यालयाचे विद्यार्थी आपले उत्तम करिअर घडवीत आहेत. कंपनीला कशा प्रकारचे विद्यार्थी हवे असतात ? याचा सखोल अभ्यास करून ‘मागणी तसा पुरवठा’ या धोरणानुसार संबधित विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षकांद्वारे प्रशिक्षण दिले जाते. सदर विद्यार्थ्यांना ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट विभागाचे डीन प्रा. तन्मय भाले व प्रा. मनीष महाले यांचे मार्गदर्शन लाभले. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटचे अध्यक्ष श्री. सुनीलजी रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, अकॅडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत व आदींनी अभिनंदन केले़.