जळगाव मिरर | १३ ऑगस्ट २०२३
सध्या देशभरात सनी देओलच्या चित्रपटाने मोठी धुमाकूळ माजवलेली आहे. या चित्रपटाने आता काही चित्रपटाची रेकॉर्ड मोडत भरमसाथ कमाई केली आहे. या मल्टिस्टारर चित्रपटाने 26 वर्षांपूर्वी बॉक्स ऑफिस धमाका केला होता. देशभक्तीवर आधारित या चित्रपटाची कथा आणि व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या होत्या.काही वर्षांपूर्वी बॉर्डर या चित्रपटाला जे यश मिळालं होतं, तसं यश फार कमी चित्रपटांना मिळतं. असं यश कोणत्याही चित्रपट निर्मात्याला आणि दिग्दर्शकाला मिळालं, तर त्यांना आनंद नक्कीच होईल; पण या चित्रपटाच्या बाबतीत तसं घडलं नाही. उलट, या चित्रपटाच्या यशाने निर्मात्यांची निराशा झाली होती.
बॉलिवूडमधले देशभक्त दिग्दर्शक अशी ओळख असलेल्या जे. पी. दत्तांचा हा ब्लॉकबस्टर चित्रपट 10 कोटींच्या बजेटमध्ये बनला होता. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने 39.45 कोटी रुपयांचं दमदार कलेक्शन केलं होतं. त्या काळात ही खूप मोठी गोष्ट होती.13 व्या वर्षी ‘या’ अभिनेत्रीनं साकारली रजनीकांतच्या आईची भूमिका; नंतर त्याच्यासोबतच केला रोमान्सया चित्रपटाच्या यशाने निर्मात्यांना झाला होता मनस्ताप26 वर्षांपूर्वी रिलीज झालेला हा चित्रपट आजही लोकांना पाहायला आवडतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या चित्रपटाच्या एवढ्या मोठ्या यशानंतरही जे. पी. दत्ता आनंदी नव्हते. `या चित्रपटाच्या यशाने माझं मन तुटलं होतं,` असं त्यांनी सांगितलं होतं.
प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाविषयी खूप उत्सुकता होती. अनेकांनी हा चित्रपट अनेकदा पाहिला. हा चित्रपट प्रेक्षकांना थिएटरकडे खेचून आणण्यात यशस्वी ठरला होता. त्या काळात एकूण तीन कोटी 70 लाख प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यासाठी आले होते.1997मध्ये रिलीज झालेला हा चित्रपट इतका यशस्वी झाला, की भारत-पाक युद्धाची दृश्यं पाहून प्रेक्षक थिएटरमध्ये अक्षरशः उड्या मारत. त्यानंतर अनेक थिएटरमधल्या खुर्च्या बदलाव्या लागल्या होत्या. इतकं यश आणि प्रेम मिळूनही जे. पी. दत्ता या चित्रपटावर खूश न होण्याचं कारण म्हणजे या चित्रपटानंतर त्यांच्या सर्व चित्रपटांची तुलना ‘बॉर्डर’च्या यशासोबत केली जाऊ लागली.
2018मध्ये एका मुलाखतीत जे. पी. दत्तांनी सांगितलं होतं, की, `बॉर्डरचं यश माझ्यासाठी निराशाजनक ठरलं. त्याचं कारण म्हणजे या चित्रपटाने इतकं यश मिळवलं की लोकांना माझे इतर चित्रपट आठवतही नाहीत.`बॉर्डर चित्रपटाची कथा, दिग्दर्शन, स्टारकास्ट अशा सर्व गोष्टी अप्रतिम होत्या. विशेषतः या चित्रपटातल्या गाण्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. आजही प्रेक्षक या चित्रपटातली गाणी विसरलेले नाहीत. त्या काळात या चित्रपटातल्या गाण्यांनी धुमाकूळ घातला होता. या चित्रपटातलं `संदेसे आते है` हे गाणं आज 26 वर्षांनंतरही लोकांच्या ओठावर आहे.
