जळगाव मिरर / २६ फेब्रुवारी २०२३ ।
राज्यात अगदी कमी वेळेत प्रसिद्ध झालेली लावणीसम्राज्ञी गौतमी पाटीलचा अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. पुण्याच्या एका कार्यक्रमात गौतमी कपडे बदलत असताना तिचा चोरून व्हिडिओ काढून अज्ञात व्यक्तीने हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केलाय. याविरोधात संपूर्ण महाराष्ट्रातुन संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत. गौतमीने तिच्या कृत्याबद्दल वेळोवेळी माफी मागितली आहे. तरीही तिचे समाजाकडून वस्त्रहरण करण्यात आल्याचं बोललं जात आहे.
प्रसिद्ध लावणी नृत्यांगना गौतमी पाटील हि सध्या अनेक कारणांमुळे चर्चेत असते. गौतमीचा अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्याने समाजाकडून संतापाच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत असून गौतमीला सपोर्ट करण्यासाठी नेटकरी पुढे आले आहेत. ‘स्त्री कपडे बदलत असताना तिचा लपून काढलेला व्हिडिओ वायरल करणे ही मर्दांगी नाही.कलाकार म्हणून तिची कदर करा, ती चुकली तिला ट्रोल करा.” याशिवाय “शिव शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे. इथे सडक्या बुद्धीच्या मानसिकतेला महाराष्ट्र कधीच समर्थन करत नाही, कदापि ते शक्य नाही.
गौतमी पाटिलचा अश्लिल व्हिडिओ काढून बदनामी करणार्यांवरती कडक कारवाई करण्यात यावी…!”, “ती चुकीच डान्स करत होते हे नक्की खर आहे त्यावर तिच्यावर बंदी घालण्यात यावी( तिने चूक मान्य केली आहे. पण आज त्या गौतमी पाटील यांच्यावर नकीच अन्याय झाला आहे आणि पोलिस अधिकारी आणि सरकार नकीच या गुन्हेगारला शोधून काढतील” अशा प्रतिक्रिया देत नेटकऱ्यांनी गौतमीच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओचा निषेध केला करून तिला पाठिंबा दिलाय. याशिवाय गुन्हेगारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
याशिवाय रीलस्टार गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा राडा झाला होता. गौतमीच्या अहमदनगर येथील कार्यक्रमात पैसे उधळल्याचा प्रकार समोर आला. या कार्यक्रमात हुल्लडबाज तरुणांना आवरण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज देखील करावा लागला. सध्या या अश्लील व्हायरल झालेल्या व्हिडिओवर गौतमीने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.




















