
जळगाव मिरर | १ मार्च २०२६
सध्या सोशल मीडियावर जुनी गाणी नव्याने चर्चेत येत आहेत, त्यात गौतमी पाटीलचा डान्स व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे. काही दिवसांपूर्वी गौतमीने माधुरी दीक्षितच्या सुपरहिट गाण्यावर डान्स करून चाहत्यांचे लक्ष वेधले होते, तर आता ‘पाटलांचा बैलगाडा’ या दमदार गाण्यावर केलेला तिचा स्टेज परफॉर्मन्स चर्चेत आला आहे.
व्हिडीओमध्ये गौतमी निळ्या ब्लाऊज आणि पांढऱ्या साडीमध्ये मंचावर उंचावलेले स्टेप्स सादर करताना दिसतेय. तिच्या एनर्जेटिक स्टाइल, अचूक तालावर बसणारी बॉडी लँग्वेज आणि खास एक्सप्रेशन्समुळे प्रेक्षक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले आहेत. चाहत्यांनी तिच्या डान्सची तुलना करण्यासारखी दुसरी कोणतीही कलाकार नसल्याचे म्हटले आहे. काहींनी या परफॉर्मन्सला ‘एनर्जीचा स्फोट’ असेही वर्णन केले आहे.
व्हिडीओ काही तासांतच लाखो व्ह्यूज मिळवून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जोरदार वायरल झाला आहे. लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत असून, चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
गौतमी पाटीलने पारंपरिक मराठी गाण्यांना आधुनिक टच देत स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. सध्या ‘पाटलांचा बैलगाडा’वरील हा डान्स चर्चेत असल्याने, पुढच्या कोणत्या गाण्यावर ती थिरकणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.





















