जळगाव मिरर / ८ मार्च २०२३ ।
संपूर्ण राज्याला आपल्या नृत्यानं वेड लावणारी गौतमी पाटीलला. सबसे कातील गौतमी पाटील असे हि म्हणू लागले आहे. तिच्या चाहत्यांची आणि तिच्यावर प्रेम करणाऱ्यांची संख्या तर अगणित असून रोजच्या रोज वाढत आहे.
पण यासोबत तिच्या डान्सवर टिका करणाऱ्यांची संख्या देखील तितकीच वाढत आहे. फक्त अश्लील डान्स नाहीच तर त्यासोबत अनेकानेक कॉन्ट्रोव्हर्सीज पण आहेत… अचानक संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरणारी ही गौतमी कोण? कुठून आली… काय आहे तिची पूर्ण कहाणी आज Womens Day च्या निमित्तानं आपण जाणून घेणार आहोत.
गौतमीनं लावणी डान्सर होण्याचा निर्णय का घेतला त्याविषयी तिनं एका मुलाखतीत खुलासा केला आहे. गौतमीचा जन्म हा तिच्या आजोळी धुळ्यातील शिंदखेडा या गावात झाला. काही दिवसांनी गौतमीच्या वडिलांनी तिच्या आईला सोडून दिलं. त्यामुळे गौतमीही शिंदखेडा येथेच लहानाची मोठी झाली. कामा निमित्तानं गौतमीचं कुटुंब हे पुण्यात गेले. अचानक आठवीत असताना गौतमीचे वडील तिच्या समोर आले. पुण्यात रहायला लागल्यानंतर गौतमीनं तिच्या वडीलांना तिथे बोलावण्याचा प्रयत्न केला होता. पण तिच्या वडिलांना दारूचं व्यसन होतं आणि त्यासोबतच ते आईला मारहाण देखील करायचे. ते पाहता तिनं वडिलांपासून दूर राहणं पसंत केलं.
