
जळगाव मिरर | ९ जुलै २०२४
चोपडा तालुक्यातील अडावद येथून जवळच असलेल्या वडगाव येथे काल रात्री उशिरा बेकायदेशीर गावठी कट्टा बाळगणाऱ्यास अडावद पोलिसांनी जेरबंद केले होते. त्यास आज चोपडा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने संशयित आरोपीस एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अडावद पाटचारी परिसरातील विलास अत्तरसिंग बारेला (वय २४) यास अडावद येथून जवळच असलेल्या वडगाव येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात, नासिर पठाण, जयदीप राजपूत, अतुल पाटील, भूषण पाटील यांच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे अटक केली होती. त्याच्या ताब्यातून १५ हजार रुपयांचे लोखंडी गावठी कट्टा हस्तगत केला होता. याप्रकरणी अडावद पोलीस ठाण्यात पो.हे.कॉ. नासिर पठाण यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. संशयित आरोपी विलास अत्तरसिंग बारेला यास सोमवारी चोपडा न्यायालयात हजर केले असता त्यास १ दिवसाची पोलीस कोठडी न्यायमूर्ती राऊत यांनी सुनावली. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण यांच्या मार्गदर्शनात पो.हे.कॉ. जयदीप राजपूत करत आहेत





















