जळगाव मिरर | १५ मार्च २०२४
जामनेर तालुक्यातील पळासखेडे(मिराचे) येथे वास्तव्यास असलेल्या विरशैव लिंगायत गवळी समाजातील प्रथा व परंपरेनुसार मयत व्यक्तीचे दफन विधी करण्यात येतो.या अंतीम विधीसाठी पळासखेडे(मिराचे) ग्रामपंचायत अंतर्गत गावठाण परिसरातील स्वतंत्र जमीन उपलब्ध होण्याबाबत समाजा तर्फे ग्रामपंचायत प्रशासनास निवेदन देण्यात आले होते.या मागणीला यश आले असून ग्रामपंचायत ने ठराव मंजूर करून समाजाला स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य विरशैव लिंगायत गवळी समाज बहुउद्देशीय संस्थेच्या जळगांव जिल्हा शाखे तर्फे ग्रामपंचायत सदस्य तथा माजी उपसरपंच रवींद्र हडप यांना निवेदन देण्यात होते. यावेळी या निवेदनात म्हटले होते की पळासखेडे(मिराचे)ता.जामनेर जिल्हा जळगांव, येथे गवळी समाज गेल्या साठ ते सत्तर वर्षापासुन वास्तव्यास आहे. अनेक वर्षांपासून गवळी समाजास दिवंगत व्यक्तीच्या अंतिम दफनविधी साठी जमीन उपलब्ध नसल्याने गैरसोय निर्माण होत होती.तरी समाजास स्वतंत्र जमीन उपलब्ध होण्यात यावी असे या निवेदनात म्हटले होते.
जमीन उपलब्ध होण्यासाठी महाराष्ट्र राज्य विरशैव लिंगायत गवळी समाज बहुउद्देशीय संस्था धुळे शाखा जळगांव जिल्हा अध्यक्ष श्री.दिपक जोमीवाळे यांनी निवेदन दिले होते.अखेर या मागणीला यश आले.
निवेदन सादर करताना गवळी समाज बहुउद्देशीय संस्थेचे युवा प्रदेश अध्यक्ष श्री.कृष्णा गठरी,जिल्हा कार्याध्यक्ष श्री.प्रकाश लंगोटे सर, जिल्हा खजिनदार शंकर काटकर, जिल्हा सहसचिव अशोक जोमीवाळे,ग्रामपंचायत सदस्य श्री दिपक परदेशी ,जेष्ठ पंच श्री.आनंदाआप्पा जोमीवाळे, शिदाआप्पा देवर्षी, लक्ष्मण नागापुरे, भागवत चौघुले,विशाल गवळी, विजय गवळी, अनिल गवळी आदी समाज बांधव उपस्थित होते.या मागणी साठी जेष्ठ समाज मार्गदर्शक श्री.ज्ञानेश्वरआप्पा बारसे,संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.भिमराजआप्पा घुगरे यांचे मार्गदर्शन लाभले.या मागणीला यश आल्याबद्दल ग्रामपंचायत व सदस्य पळासखेडे (मिराचे) ता.जामनेर जिल्हा जळगाव, यांचे सर्व समाजाने आभार मानले आहे.