जळगाव मिरर | ४ जानेवारी २०२५
जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अल्पवयीन मुलीसह विवाहितेवर अत्याचाराच्या घटना सुरूच असतांना नुकतेच भडगाव तालुक्यातील एका गावात तेरा वर्षीय बालिका शाळेत जात असताना गावातील एका तरुणाने तिचा पाठलाग करून तिचा हात पकडला व माझ्याशी “लग्न कर नाहीतर तुला सोडणार नाही”, अशी धमकी दिली. याप्रकरणी बालिकेच्या फिर्यादीवरून एका विरूद्ध भडगाव पोलिस स्टेशनला पोस्को कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एका गावात तेरा वर्षीय बालिका शाळेत जात असतांना गावात राहणारा गोरख कोळी हा मोटार सायकलने बालिकेचा पाठलाग करुन तिचा हात पकडला व माझ्या सोबत लग्न करशील का? असे विचारले. त्यावर बालिकेने नकार देवून हात सोडवून तेथून शाळेत निघुन गेली. त्यानंतर दुस-या दिवशी पुन्हा बालिका शाळेत जात असतांना गोरख सुभाष कोळी याने तिच्या अंगावर चिड्डी फेकून बालिकेला मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करुन तु जर चिड्डी उचलली नाही तर तुला मारुन टाकेल अशी धमकी दिली. म्हणून याप्रकरणी भडगाव पोलीस स्टेशनला गु.र.न.०५/२०२५ मा.न्या. संहिता ७४.७१.३५९/२) पोस्को का. क. ७,८,११,१२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास म. पो. कॉ. शामिना पठाण या करित आहे.
