जळगाव मिरर / ८ डिसेंबर २०२२
सध्या प्रेम प्रकरणामुळे तरुण आणि तरुणी कोणता मार्ग स्वीकारतील यांचा थांग पत्ता लागत नाही. तर तरुण तरुणी सोशल मीडियामुळे जवळ येत असून त्यामधून घडणारे गुन्हे हे भयंकर असतात. त्यामुळे कधी कधी जीव हि जातो तर कधी कधी पोलीस स्टेशनची हवा हि खावी लागते तसेच एक प्रकरण समोर आले आहे. तरुणाचे ब्रेकअप झाल्यानंतर त्याने चक्क आपल्या प्रेयसीचा नग्न फोटो व्हॉट्सअप स्टेटस ठेवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पुण्यातील कोंढवा परिसरात हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी शिरूरमधील देवेंद्र धरमचंद फुलपगार या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही प्रेमसंबंधात होते. काही दिवसांपूर्वी दोघाचं ब्रेकअप झालं. त्यानंतर देवेंद्रनं त्याच्या प्रेयसीला त्रास द्यायला सुरुवात केली. प्रियकर तिचा मानसिक छळ करत होता. त्यामुळे तिने या त्रासाला कंटाळून पोलिसांत धाव घेतली. पोलिसांकडे तक्रार दिल्यामुळे देवेंद्रनं प्रेयसीचे नग्न फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले.
या सगळ्या प्रकरणाची तक्रार तरुणीने मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात दिली आहे. या प्रकरणी आरोपी असलेल्या देवेंद्रवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. तिच्यावर पोलिसांत दिलेली तक्रार मागे घेण्यासाठी त्याने तगादा लावला होता. गुन्हा मागे न घेतल्याने आरोपीने त्याच्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर तरुणीचा विवस्त्रावस्थेतील फोटो ठेवून ‘ये तो शुरुआत है’ असे स्टेटस ठेवले होते.




















