
जळगाव मिरर । १५ डिसेंबर २०२२
अखिल गोवा दलित महासंघ गोवा राज्य या संस्थेतर्फे कवी व कवयित्रींसाठी सामाजिक विषयावर मराठी कविता स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेचा निकाल जाहिर झाला असून त्या स्पर्धेत जळगाव येथील सामाजिक,धार्मिक कार्यकर्ते लेखक व कवी सतिष जगन्नाथ निकम यांना विशेष पारितोषिक जाहिर झाले असून गोवा येथे १९ डिसेंबर रोजी सदरचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून त्यास खास आमंत्रित करण्यात आले आहे.
बक्षीस पात्र कविता महासंघाच्या १९ डिसेंबर २०२२ रोजी पणजी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन कार्यक्रमावेळी प्रकाशित करण्यात येणाऱ्या भाग्यविधाता स्मरणिकेत प्रसिद्ध करण्यात येणार आहे. कवि सतिष निकम आंतर राज्यस्तरिय कविता स्पर्धेचे विजेते आहेत. त्यांचे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे.




















