जळगाव मिरर | ५ मे २०२३
यंदा मे महिन्यात मोठ्या प्रमाणात लग्नसराई सुरु झालेली असतांना गेल्या अनेक दिवसापासून सोन्यासह चांदीचे दर वधारले होते, त्यानंतर आज सोन्याच्या दरात मोठी वाढ झालेली बाजारात दिसून आली आहे. याशिवाय लग्नखरेदीव्यतिरिक्त लोक सोनं खरेदी करून ठेवत आहेत. आजच्या वाढलेल्या किंमती पाहून तर सोनं खरेदी करावं की नाही असा खरंच प्रश्न पडला आहे. याचं कारण म्हणजे सोनं जवळपास 64 हजारांच्या जवळपास पोहोचलं आहे. गेल्या 96 वर्षांतला रेकॉर्ड मोडला आहे. एकेकाळी एक किलो चांदीची किंमत जेवढी होती तेवढी किंमत आज एक तोळे सोन्याची झाली आहे.
गेल्या 20 वर्षांत तर सोनं अगदी झपाट्याने वाढलं आहे. त्यामुळे सोनं खरेदी करणं किंवा दागिनेही करणं आवाक्याबाहेर होत आहे. सोनं खरेदी करायचं की नाही असा प्रश्न देखील पडला आहे. बाहेर तर सोडाच हो पण महाराष्ट्रातील सुवर्णनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावमध्येच सोनं 63 हजार ७०० वर पोहोचलं आहे. सोनं चांदीच्या दरात आज मोठी वाढ झाली आहे. तर लग्नसराईमुळे सोन्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. जळगावच्या बाजारामध्ये सोन्यामध्ये आज मोठी भाव वाढ झाली असून जळगावच्या बाजारात सोन्याचे भाव 61 हजार 800 वर पोहोचला आहे. GST पकडून हाच दर 63 हजार सातशे रुपयांवर पोहोचला आहे. 48 तासांमध्ये सोन्याचे भाव 1200 रुपयांनी वाढला. त्यामुळे सोनं खरेदी करणं म्हणजे अवघडच अशी अवस्था झाली आहे. चांदीच्या भावात मागील 24 तासात तब्बल एक हजार रुपयांनी वाढ झाली.
एक किलोचा दर आज 78 हजार रुपये आहे. अमेरिकन फेडरल बँकेच्या धोरणामध्ये होत असलेल्या बदलाचा परिणाम यात दिसून येत आहे. याचा परिणाम म्हणून ग्राहकांनी सोन्याकडे गुंतवणूक वळली आहे. एकीकडे लग्न सदाची धामधूम सुरू असताना सोने आणि चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने अनेकांचे बजेट ही कोलमडलं आहे. सोने हे लग्नसराईत अवश्य असल्याने कमी प्रमाणात का होईना ग्राहक सोन्याच्या दुकानावर खरेदी करताना दिसून येत आहे. त्यामुळे जळगावच्या बाजारात सोन्याचे भाव हे गगनाला भिडले आहेत.
