जळगाव मिरर । २७ ऑक्टोबर २०२२
दिवाळीच्या पाच दिवसांमध्ये सोने चांदीच्या दरात घट झाली होती तर आज मात्र दर वाढलेला दिसून आला आहे. आज सोने आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 47,000 रुपये तर 24 कॅरेट साठी 51,280 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 581 रुपये आहे. देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या.
चेन्नई – 51,980 रुपये
दिल्ली – 51,430 रुपये
हैदराबाद – 51,280 रुपये
कोलकत्ता – 51,280 रुपये
लखनऊ – 51,280 रुपये
मुंबई – 51,110 रुपये
नागपूर – 51,310 रुपये
पुणे – 51,310 रुपये
सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.