जळगाव मिरर | २५ जून २०२४
जळगाव शहराची सुवर्ण नगरी म्हणून ओळख आहे. याच नगरीत गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात चढ उतार दिसून येत आहे. त्यातच आज सोने खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर आहे.
सोन्याच्या दरात आज घसरण झाली आहे. त्यामुळे मुंबईत 24 कॅरेट सोन्याचे प्रती 10 ग्रॅमसाठीचे भाव 72230 रुपयांवर आले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याचे दर 66250 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याचे भाव 54210 रुपये झाले आहेत. चांदीच्या दरात आज 300 रुपयांची घसरण झाली आहे. दोन दिवसांपूर्वी भाव 2 हजारांनी कमी झाले होते.
जळगाव येथील सराफा व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आजचे सोन्याचे दर 71,710 तर चांदीचा दर 89,450 दर आहे.
शहर 22 कॅरेट सोन्याचा दर 24 कॅरेट सोन्याचा दर
मुंबई 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 65,661 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत 71,630 प्रति 10 ग्रॅम आहे.
पुणे प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 65,661 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर 71,630 रुपये आहे.
नागपूर 24 कॅरेट सोन्याचा दर 71,630 रुपये इतका आहे.
नाशिक 24 कॅरेट सोन्याचा दर 71,630 रुपये आहे.