जळगाव मिरर | १६ मार्च २०२५
बुलडाणा अर्बन को ऑप. क्रेडिट सोसायटी लि. बुलडाणाच्या स्वमालकीच्या कोल्ड स्टोरेजचा भव्य शुभारंभ सोहळा व ग्राहक मेळावा मंगळवार दि. १८ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ६.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे.
बुलडाणा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीने जळगावपासून अजिंठा रोडवरील कुसुंबा शिवारातील विमान तळाजवळ शाखंभरी माता मंदिराला लागून असलेल्या लॉजिस्टीक पार्क येथे बुलढाणा अर्बन कोल्ड स्टोअरेज तयार केले असून स्वमालकीच्या या कोल्ड स्टोअरेजचे उद्घाटन व ग्राहक मेळाव्याचे आयोजन दि. १८ रोजी सायंकाळी करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून संस्थापक अध्यक्ष राध्येश्याम चांडक, अध्यक्ष डॉ. सुकेश झंवर, अध्यक्षा कोमल झंवर, सर्व संचालक, पुणे विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे, सरव्यवस्थापक कैलास बंन्सीलाल कासट यांची उपस्थिती लाभणार आहे. दरम्यान, ५७०० मे. टन क्षमतेचे हे कोल्ड स्टोअरेज असल्याचे विभा. व्यवस्थापक रमेश पवार, शाखा व्यवस्थापक, अविनाश पाटील, विभा व्यवस्थापक गोपालसिंग पाटील यांनी सांगितले.