
अमळनेर : विक्की उत्तम जाधव
संगीतमय भागवत कथेत मुक्तानंदजी भारती महाराज तालुक्यातील रणाइचे तांडा येथील बंजारा समाज बांधवानी रुद्र नंद सरस्वती अध्यत्मिक आश्रमात 13 करोड जप आणि भागवत महायज्ञ केले. त्याप्रसंगी मुक्तानंदजी भारती महाराज यानीबकथा निरूपण केले आहे. कथेला सुरुवात होण्याअगोदर संपूर्ण रणाईचे गावात मुक्तानंद महाराज यांची रथावरून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी संपूर्ण बंजारा समाज बांधव, महिला, आबाल वृद्ध यांनी यात सहभाग नोंदविला.
यावेळी ढोल ताशा च्या गजरात मिरवणुक काढण्यात आली आणि कथेला सुरुवात करण्यात आली. यावेळी रणाईचे येथील सरपंच प्रकाश चव्हाण, उपसरपंच मिश्रीलाल राठोड, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र राठोड, रामचंद्र चव्हाण, धारासिंग पवार, सुभाष राठोड, लक्षमण राठोड, श्रवण राठोड, गुलाब राठोड, श्रवण पवार, माजी उपसरपंच रमेश मांगू चव्हाण, धर्मदास राठोड, रसाल राठोड, झवरलाल राठोड, राजेंद्र चव्हाण, रामदास राठोड, मुलसिंग पवार, भाईदास चव्हाण, गिरीधर चव्हाण, आदी समाज बांधव आणि ग्रामस्थ उपस्थित होते.




















