
जळगाव मिरर | ११ जुलै २०२५
शिवसेना जळगाव जिल्हा मध्यवर्ती संपर्क कार्यालयात गुरुपौर्णिमेच्या शुभदिनानिमित्त श्री स्वामी समर्थ महाराज, स्वराज्याचे शिल्पकार छत्रपती शिवाजी महाराज, मराठी बाण्याचे प्रतीक व हिंदुत्वाचा ध्वजवाहक हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे, आणि शिवसेनेचे निष्ठेचे अधिष्ठान गुरूवर्य स्व. आनंद दिघे साहेब यांना सामूहिक वंदन करण्यात आले.
या पवित्र दिवशी त्यांच्या कार्याची आठवण करत, प्रेरणादायी स्मृतींना अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख जितेंद्र गवळी विशाल निकम दिपक माळी दिपक पाटील कुणाल तायडे भावेश ढाके चेतन वाघ आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.




















