
जळगाव मिरर । २१ नोव्हेबर २०२२
शहरातील एका खाजगी बँकेतील व्यक्तीस रस्त्यावर फोन करण्यासाठी मोबाईल घेवून पळ काढत मोबाईल चोरी केल्या प्रकरणी एका अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील जुने बी.जे.मार्केट परिसरात एका अनोळखी व्यक्तीने अक्षय सुरेश काळवाघे यांना सांगतिले कि माझा मोबाईल बंद झाला आहे. एक फोन करायचा आहे सांगून फोन लावत फोनवर बोलत रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जात दुचाकी घेवून दि १९ रोजी पळ काढला अक्षय यांचा १० हजार किमतीचा मोबाईल चोरून नेल्याप्रकरणी एका अनोळखी इसमाविरोधात जिल्हा पेठ पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.महेद्र पाटील हे करीत आहेत.




















