
पारोळा : प्रतिनिधी
तुझी मुलीला क्लासवरुन उचलून नेत कुठेतरी सोडुन देईन. तसेच तुझ्या पत्नीवर भर रस्त्यावर अत्याचार करेल, अशी धमकी दित फिर्यादीच्या पत्नीला जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी पारोळा पोलीस स्थानकात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास फिर्यादी हे ते आपल्या पत्नीसह घरी होते. चहा पिऊन माझ्या ओट्यावर उभा राहिल्यानंतर काही वेळाने ते घरात परत जाऊन बसले. थोड्यावेळाने समोरील बालू हिरामण खाडे, विनोद हिरामण खाडे, देविदास हिरामण खाडे आणि एकाने आमच्याशी नेहमी वाद का घालतो?, म्हणत जातीवाचक शिवीगाळ करायला सुरुवात केली. एवढेच नव्हे तर तुझी मुलीला क्लासवरुन उचलून नेत कुठेतरी सोडुन देईन. तसेच तुझ्या पत्नीवर भर रस्त्यावर अत्याचार करेल, अशी धमकी दिली. विशेष म्हणजे संशयित आरोपींनी या आधी देखील अश्या प्रकारे शिवीगाळ केली असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव हे करीत आहेत.




















