जळगाव मिरर / १० ऑक्टोबर २०२२
ठाकरे गटाला आज सोमवारी सायंकाळी ‘धग धगती मशाल ‘ हे चिन्ह मिळाल्याने राज्यातील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी चांगलाच आनंद व्यक्त केला तर दुसरीकडे शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना ‘ नाव मिळाल्याने त्यांनीही आनंद व्यक्त केला, तर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया आता चर्चेत आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मिळालेल्या नव्या चिन्हावरुन आता सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे. त्यावरुन नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया लक्ष वेधून घेत आहेत. यासगळ्यात पेडणेकर यांची प्रतिक्रिया भलतीच व्हायरल झाली आहे.
काळरात्र होता होता
उषःकाल झालाअरे पुन्हा शिवसैनिकांनो
पेटवा मशाली pic.twitter.com/C118fQuoJ2— Kishori Pednekar (@KishoriPednekar) October 10, 2022
उषकाल होता होता हे गाणं सादर करताना त्यांनी म्हटलं आहे की, त्यांनी खरं ते गाणं वेगळं आहे. मात्र आपण शिवसैनिकांसाठी ते गाणं थोड्या वेगळ्या पद्धतीनं तयार केलं आहे. राज्याच्या घडामोडींकडे पाहता त्या गाण्यामध्ये बदल करण्यात आला आहे. हे गाणं सादर करताना पेडणेकर यांचा उत्साह दिसून येतो आहे. त्यांनी आता नव्यानं एका लढाईला आपल्या सर्वांना सामोरं जायचं असून त्यासाठी तयार राहण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे.
काळरात्र होता होता उष:काल झाला, अरे पुन्हा शिवसैनिकांनो पेटवा मशाली, पेटवा मशाली. आपल्याला शिवसेना उद्ववजी बाळासाहेब ठाकरे असे नाव मिळाले. आपण पहिली लढाई जिंकली. आता प्रत्येक घराघरात हे चिन्ह आपल्याला पोहचावयचे आहे. ज्यानं आपल्या पक्षात काळरात्र केली त्याला दाखवून द्या की शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे. किशोरी पेडणेकर यांच्या प्रतिक्रियेवर नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पुन्हा प्रतिक्रिया दिल्या आहे.
