
जळगाव मिरर । २१ जून २०२३
भुसावळ तालुक्यातील एका गावातील ५ वर्षीय चिमुकला खेळता खेळता पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात शोककळा पसरली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील वरणगाव शहरातील सरस्वती नगरातील रहिवासी व बोहर्डीच्या एका शिक्षण संस्थेत शिपाई असलेल्या हेमेंद्र बडगुजर याना दोन मुले आहे. त्यांच्या घराबाहेरच पाणी साठविण्यासाठी हौद बांधला असून मंगळवारी खेळत असताना चिमुकला कर्णव हेमेंद्र बडगुजर(वय ५) त्यात पडला मात्र बराच वेळ होवून कर्णव दिसत नसल्याने त्याच शोध सुरू असताना हा प्रकार उघडकीस आला. बुधवारी कर्णववर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. कर्णव हा शहरातीलच सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये सिनीयर केजीमध्ये शिक्षण घेत होता. चिमुकल्याच्या अकाली मृत्यूने शहरातून हळहळ व्यक्त करण्यात आली.




















