
जळगाव मिरर / २५ नोव्हेंबर २०२२
राज्यात हिवाळ्याच्या थंडीमुळे सर्वच ठिकाणी पाणी गरम करून अंघोळ करीत आहेत पण यंदाच्या हिवाळ्यात राज्यातील बहुतेक अपघात झाले आहे.
पाणी गरम करण्यासाठी पहाटे बादलीत हीटर लाऊन घरात खेळत असणारी चार वर्षीय श्रेया राजेश शिंदे ही चिमुरडी उकळत्या पाण्यात पडून गंभीररीत्या भाजल्याची घटना बुधवारी दुपारी वाळूज औद्योगिक वसाहत परिसरातील कमळापुरात घडली होती. या घटनेनंतर तिच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान आज शुक्रवारी दि. २५ रोजी तिची प्राणज्योत मालवली.
औरंगाबाद येथील वाळूज परिसरातील कमळापूर येथे राहणारे राजेश शिंदे हे मुळ परभणी येथील रहिवासी असून ते अध्या पत्नी, आई-वडील भाऊ व एक मुलगी श्रेया यांच्यासह कमळापुरात राहतात. त्यांची पत्नी डिलिव्हरीसाठी माहेरी गेल्याने मुलगी श्रेया त्यांच्याजवळच राहत होती. बुधवारी (दि.२३) दुपारी त्यांना कंपनीत जायचे असल्याने घरात प्लास्टिकच्या बाटलीमध्ये हिटर लावले होते. घरात आई-वडील भाऊ सर्व कुटुंब होते. खेळता खेळता श्रेया पाणी गरम करणाऱ्या हीटर कडे गेली आणि अचानक ती बादलीत पडली. कुटुंबियांनी तातडीने तिला घाटीत रुग्णालयात दाखल केले. 80 ते 90 भाजलेल्या श्रेयाची मृत्यूशी झुंज सुरू होती. अखेर आज (दि. 25) सकाळी सात वाजेच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल कारभारी गाडेकर हे करीत आहेत.




















