जळगाव मिरर | ४ सप्टेंबर २०२५
जळगाव जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष हेमंत शंकरराव काळुंखे वय वर्ष 71 यांचे दिनांक 3 सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजून 24 मिनिटांनी राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा दिनांक 4 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजेला राहत्या घरून खेडी शिवार पत्रकार कॉलनी जळगाव येथून नेरी नाका स्मशान भूमी जळगाव येथे निघणार आहे त्यांच्या पश्चात दोन भाऊ, पत्नी, दोन मुले सुना नातवंडे असा परिवार असून ते रेशन दुकानदार श्री हेमरत्न व मकरंद काळुंखे यांचे वडील होते.