जळगाव मिरर | २१ जुलै २०२५
गेल्या काही महिन्यापासून राज्यातील महायुती सरकारमधील मंत्री वादग्रस्त विधानासह काही घटनेमुळे चर्चेत येत असतांना आता राज्याच्या राजकारणात हनी ट्रॅप प्रकरणाने पुन्हा एकदा खळबळ माजवली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी X वर एक खळबळजनक दावा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. फडणवीस यांनी विधानसभेत “राज्यात हनी ट्रॅपचा कोणताही प्रकार नाही” असा दावा केला होता, पण राऊतांनी भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांचा प्रफुल्ल लोढा यांच्यासोबतचा फोटो शेअर करत CBI चौकशीची मागणी केली आहे. संजय राऊत यांनी या प्रकरणात चार मंत्र्यांसह चार तरुण खासदारांचा समावेश असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
काय आहे प्रकरण ?
नाशिकमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये कथित हनी ट्रॅप रॅकेटद्वारे ७२ हून अधिक व्यक्ती, यामध्ये वरिष्ठ IAS, IPS अधिकारी, माजी आणि विद्यमान मंत्री, तसेच काही राजकीय नेते अडकल्याचा दावा केला जात आहे. या प्रकरणात प्रफुल्ल लोढा नावाच्या व्यक्तीवर अल्पवयीन मुलींवर अत्याचार आणि हनी ट्रॅपचे गंभीर आरोप आहेत. लोढा हा गिरीश महाजन यांचा निकटवर्तीय आणि विश्वासू कार्यकर्ता असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. या प्रकरणात संवेदनशील व्हिडीओ रेकॉर्ड झाल्याचा दावा एका महिलेने केला असून, ठाणे क्राइम ब्रांचला तीन तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, ज्याची गोपनीय तपासणी सुरू आहे.
काँग्रेस नेते आणि माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेत एक पेन ड्राइव्ह दाखवत यात ७२ IAS अधिकारी आणि माजी मंत्र्यांचा समावेश असल्याचा दावा केला होता. याशिवाय, संजय राऊत यांनी X वर शेअर केलेल्या पोस्टमध्ये गिरीश महाजन यांच्यासोबत प्रफुल्ल लोढा यांचा फोटो शेअर करत “दुध का दुध, पानी का पानी” होण्यासाठी CBI चौकशीची मागणी केली आहे. संजय राऊत यांनी असा दावा केला आहे की, एकनाथ शिंदे गटात सामील झालेले चार तरुण खासदार हे हनी ट्रॅपमुळे शिवसेनेतून फुटले, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
https://x.com/rautsanjay61/status/1947129399633224158?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1947129399633224158%7Ctwgr%5E48313351a487285e87679a37c4597ab492049b76%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.dainikprabhat.com%2Fsanjay-raut-demands-cbi-probe-in-maharashtra-honeytrap-scandal%2F
संजय राऊतांचा दावा काय?
राऊत यांनी आपल्या X पोस्टमध्ये लिहिले, “मुख्यमंत्री देवेंद्रजी विधानसभेतही दिशाभूल करतात. महाराष्ट्रात हनी ट्रॅप नाही असे त्यांनी सांगितले. या एका फोटोची CBI मार्फत चौकशी होऊद्या! दूध का दूध, पानी का पानी होईल! ४ मंत्री, अनेक अधिकारी अडकले आहेत! शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार याच ट्रॅपमुळे पळाले.” या दाव्याने सत्ताधारी महायुती आणि विशेषतः भाजप-शिंदे सेना गटावर दबाव वाढला आहे. राऊत यांनी थेट नावे न घेतली तरी, त्यांनी गिरीश महाजन यांचा फोटो शेअर करत CBI चौकशीची मागणी केल्याने हे प्रकरण अधिक गंभीर बनले आहे.
