जळगाव मिरर | ७ मे २०२४
राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतांना सताधारी व विरोधकामध्ये आरोप प्रत्यारोप देखील सुरु आहे. तर नुकतेच भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी थेट शरद पवार गटाचे नेते रोहित पवारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
नेते महाजन म्हणाले कि, कधी पावसात भिजल्याने किंवा रडल्याने निवडणूका जिंकता येत नाहीत, मतदारांना तुम्ही किती दिवस भावनिक करसाल, कधी तरी विकासावर मत मागा, असा खोचक टोला त्यांनी यावेळी लगावला आहे. बारामतीमध्ये रविवारी सुप्रिया सुळे यांच्या प्रचार सांगता सभेत बोलताना रोहित पवार भावुक झाले होते, त्यासभेवर बोलताना गिरीश महाजन यांनी शरद पवारांसह रोहित पवारांवर निशाणा साधला.
गिरीश महाजन यांनी पुढे बोलताना पुन्हा उद्धव ठाकरेंवर प्रहार केला. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे किती वर्ष आमच्या सोबत होते. त्यावेळी उद्धव ठाकरेंना सर्व गोड वाटलं का? ज्यावेळी सोबत होते त्यावेळी उद्धव ठाकरे हे नरेंद्र मोदींचे कौतुक करत होते. आता विरोधात गेले म्हणून काहीही बोलावं का?, आमच्या भरवशावरच तुमच्या 18 जागा निवडून आल्या. शिवसेनेचे खासदार, आमदार कुणाच्या भरशावर निवडून आले होते? आम्ही नसतो तर 15 आमदार तरी उद्धव ठाकरे यांना निवडून आणता आले असते का? याचे उत्तर उद्धव ठाकरेंनी द्यावं. मंत्री गिरीश महाजन यांनी शरद पवारांसह रोहित पवारांवर टीका केली. ते म्हणाले की, कधी पावसात भिजायचं, कधी रडायचं, कधी आजारी पडायचं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. शरद पवारांची तब्येत खराब असते, त्यांच्या तब्येतीवर बोलणं उचित होणार नाही.
