
जळगाव मिरर | ८ ऑगस्ट २०२५
रात्री कुटुंबिय गाढ झोपेत असतांना कौतिक सुकलाल साळुंखे (वय ३८, मूळ रा. किनगाव, ता. यावल, ह. मु. रामेश्वर कॉलनी) ही घटना बुधवार रात्रीच्या सुमारास घडली. त्यांच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, यावल तालुक्यातील किनगाव येथील कौतिक साळुंखे हा रामेश्वर कॉलनीत वास्तव्यास होता. बुधवारी रात्री त्यांनी कुटुंबियांसोबत जेवण केले, आणि त्यानंतर ते झोपून गेले. रात्रीच्या सुमारास कुटुंबिय गाढ झोपेत असतांना कौतिक साळुंखे यांनी गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. काही वेळानंतर हा प्रकार त्यांच्या पत्नीच्या लक्षात येताच त्यांनी एकच आक्रोश केला. त्यांचा आवाज ऐकून शेजारी तात्काळ धावून आले.
घटनेची माहिती मिळताच शेजाऱ्यांनी तातडीने कौतिक साळुंखे यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. कौतिक साळुंखे यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. त्यांच्या पश्चात पत्नी नैना आणि तीन लहान मुले असा परिवार आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.




















