
अमळनेर : विक्की उत्तम जाधव
अमळनेरला पत्रकार भवन बांधून पूर्णत्वास नेण्यासाठी मी सदैव पत्रकारांसोबतच आहे. मी पुढे पदावर असेल किंवा नसेल, तरीसुद्धा वैयक्तिक पातळीवर मी हे हाती घेतलेले काम कोणत्याही प्रकारे पूर्णच करून दाखवेन असे अभिवचन आमदार अनिल दादा यांनी अमळनेर तालुका पत्रकारांनी आयोजित पत्रकारदिनाच्या समारंभात आज पुनच दिले आहे. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी आ. अनिलदादा पाटील होते.

जशाच्या तशा बातम्या अनेक प्रसार माध्यमांमध्ये येणे यावर अॅड.ललिता पाटील यांनी नापसंती व्यक्त केली. संपादकीय लिखाण हा वृत्तपत्राचा आत्मा असतो. त्यावर पत्रकारांनी भर दिला पाहिजे, अशी अपेक्षा यावेळी अँड. ललिता पाटील यांनी व्यक्त केली.
आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमा पूजनाने या समारंभाचा आरंभ करण्यात आला. पत्रकारिता व्यतिरिक्त विविध क्षेत्रांत नैपुण्य दाखविलेल्या पत्रकारांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दोनही पत्रकार संघ एकत्रित आलेले. हे आजच्या या समारंभाचे वैशिट्य ठरले.
व्यासपीठावर माजी आमदार स्मिताताई वाघ, तसेच गोकुळ बोरसे, पत्रकार संघ अध्यक्ष चेतन राजपूत, चिटणीस चंद्रकांत पाटील, ज्येष्ठ पत्रकार पांडुरंग पाटील, सुभाष पाटील, पंडीत चौधरी, चंद्रकांत काटे, डिंगबर महाले, प्रा. विजय गाडे हे देखील उपस्थित होते.
अमळनेर तालुका पत्रकार संघाला मराठी पत्रकार परिषदेचा राज्यस्तरीय नाशिक विभागीय यंदाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल संघटनाध्यक्ष चेतन राजपूत, सेक्रेटरी चंद्रकांत पाटील, उपाध्यक्ष जितू ठाकूर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
मारवड शिक्षण संस्था चेअरमन जे.एम. पाटील, मनोज पाटील, अँड. तिलोत्तमा पाटील, बी. के. सूर्यवंशी, विक्रांत पाटील, महेंद्र बोरसे, शितल देशमुख, तसेच न.पा. प्रशासक प्रशांत सरोदे, सोबत संजय चौधरी, संदीप गायकवाड त्याचप्रमाणे तालुका कृषि अधिकारी भरत बारे, अशोक पाटील, रणजित शिंदे, खा. शि. अध्यक्ष जितेंद्र झाबक, माधुरी पाटील, वसुंधरा लांडगे, शिरीषदादा मित्र परिवारातर्फे प्रवीण पाठक, पंकज चौधरी, अबू महाजन, पांडुरंग महाजन, त्याचप्रमाणे अर्बन बँक संचालक प्रवीण जैन, डॉ. प्रकाश ताळे, भास्कर बोरसे, प्रा. महाजन, संजय पाटील, महेश देशमुख, सुरेश पाटील, प्राचार्य डॉ. एम एस बाघ, प्रा.डॉ. अरुण कोचर आदि असंख्य मान्यवर आलेले होते.




















