जळगाव मिरर | ४ एप्रिल २०२५
तु मला आवडतेस मला तुझा नंबर दे असे म्हणत शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्याचा विनयभंग केला. ही घटना दि. २ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी संशयित गोपाळ पाटील यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील नशिराबाद येथील सरकारी दवाखान्यात महिला वैद्यकीय अधिकारी नियक्तीस आहे. या गावातील संशयित गोपाळ धनराज पाटील उर्फ करोडपती हा व्यक्ती त्या महिला अधिकाऱ्याच्या टेबलाजवळ आला. त्याने तू माझी आहेस, तुझा नंबर मला दे व माझा नंबर घे, माझ्यासोबत बोल असे म्हणाला. तसेच यापुर्वी देखील तो त्या महिला अधिकाऱ्याच्या पाठलाग करुन तु मला आवडतेस असे म्हणून त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करुन त्यांचा विनयभंग केला. हा त्रास असह्य झाल्याने त्या महिला अधिकाऱ्याने नशिराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार संशयित गोपाळ पाटील याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ अतुल महाजन हे करीत आहे.