जळगाव मिरर | १८ ऑक्टोबर २०२३
गेल्या १५ दिवसापासून राज्यातील पोलीस ज्याच्या शोधात होते त्याला अखेर मुंबई पोलीस आणि पुणे पोलिसांना हवा असलेला ड्रग्ज माफिया ललित पाटील याला मुंबई पोलिसांनी चेन्नईतून अटक केली. त्यानंतर त्याला मुंबईत आणण्यात आलं. दरम्यान, कोर्टात हजर करण्यापूर्वी त्याला चेहऱ्यावर कपडा टाकून रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात येत होतं.
यावेळी मीडियाच्या प्रतिनिधींनी त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असताना एबीपी माझ्याच्या कॅमेऱ्यासमोर ललित पाटील यानं खळबळजनक आरोप केला. मी ससूनमधून पळून गेलो नाही तर मला पळवण्यात आलं. यामध्ये कोणाकोणाचा हात आहे हे सर्व सांगेन” असं त्यानं म्हटलं.
ड्रग्ज माफिया ललित पाटील याला मुंबई पोलिसांनी चेन्नई इथून अटक केली आहे. यानंतर त्याला मुंबईत आणण्यात आलं. यावेळी मीडियाच्या कॅमेरॅसमोर बोलताना मी ससून रुग्णालयातून पळून गेलो नाही तर मला पळवण्यात आलं, असा खळबळजनक आरोप त्यानं केला आहे. एबीपी माझानं याबाबत वृत्त दिलं आहे