जळगाव मिरर | १८ जुलै २०२३
राज्यातील भाजपच्या सत्तेत शिवसेनेसोबत गेलेले प्रहार पक्षाचे नेते व आ.बच्चू कडू यांच्यासह त्यांच्या पक्षातील एक आमदार देखील सत्तेत सहभागी झाले होते. त्यानंतर अनेक कार्यक्रमात आ.बच्चू कडू यांनी थेट मंत्रीपदासाठी आग्रही असतांना नेहमी दिसून आले होते. मात्र आता राष्ट्रवादी देखील सत्तेत आल्यानंतर त्यांनी मला मंत्री पद देवू नका अशी विनवणी बच्चू कडू यांनी केली पण त्यापुढे ते म्हणाले कि, माझ्या सोबत आलेल्या आमदाराला तरी मंत्री करा.
मंत्रिपदासाठी चर्चे असलेले आमदार बच्चू कडू यांनी मंत्रिपदाचा दावा सोडला आहे. मुख्यमंत्री अडचणीत आहेत, मंत्रिपदासाठी ओढाताण सुरू आहे. मी मंत्रिपदाचा दावा सोडत आहे हे मी आज जाहीर करतो. मला मंत्रालय दिलंय त्यामुळं मी दावा सोडतो, असे बच्चू कडू यांनी जाहीर केले. माझ्या जागी हवं तर आमचे आमदार राजकुमार पटेल यांना राज्यमंत्री पद अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे.