• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

‘त्या’ आठवणी जर आजही आल्या तर नक्कीच पुन्हा ते आयुष्य मिळाले !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 14, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
‘त्या’ आठवणी जर आजही आल्या तर नक्कीच पुन्हा ते आयुष्य मिळाले !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर । १४ नोव्हेबर २०२२ – बाल दिन विशेष 

“एकदा केव्हातरी शांतपणे बसावं आणि वयानुसार आपण काय काय गोष्टी सोडल्या ह्याचा आढावा घ्यावा. मग लक्षात येतं, की आपण गाभुळलेली चिंच अनेक वर्षात खाल्लेली नाही. जत्रेत मिळणारी पत्र्याची शिट्टी वाजवलेली नाही. चटक्यांच्या बिया घासून चटके द्यावेत असं आता वाटत नाही.कॅलिडोस्कोप पाहिलेला नाही. सर्कसमधला जोकर आपलं मन रिझवू शकत नाही. तसंच कापसाची म्हातारी पकडण्याचा चार्मही राहिलेला नाही. कापसाच्या म्हातारीने उडता उडता आपला बाळपणीचा काळ सुखाचा स्वत:बरोबर कधी नेला ते आपल्याचा कळलंच नाही. आता त्या ट्रिप्स नाहीत. दोन दोन मुलांच्या जोड्या करून चालणं नाही. विटी दांडू नाही. साबणाचे फुगे नाहीत. प्रवासात बोगदा आला तर एक अनामिक हुरहुर नाही…… त्या उडणार्‍या म्हातारीने हे सगळे आनंद नेले. त्याच्या बदली तिचं वार्धक्य तिने आपल्याला दिलं. म्हणूनच ती अजून उडू शकते. आपण जमिनीवरच आहोत.”

वपुंच्या वपूर्झा मधील ह्या ओळी आठवल्या अन् मन भुर्रकन काही वर्षे मागे गेलं…आणि सारं सारं बालपण आठवलं.
खरंच बालपणीचा काळ किती सुखाचा ना? आयुष्यातील काही अनमोल क्षणांची आठवण ते क्षण निसटुन गेल्यावरच प्रकर्षाने होते. पण बालपणीच्या काही आठवणी, मनाच्या कोपर्‍यात अजुनही दाटलेल्या असतात, त्यांना हलकेच गोंजारल असता त्यांची सय अधिकच गडद होते. आपलं मनही किती विचित्र असतं ना. जेंव्हा लहान असतो तेंव्हा पटकन मोठे व्हावेसे वाटते. शाळा सोडुन बाबांसारखे ऑफिसला जावेसे वाटते तर दादासारखे कॉलेजला जावंस वाटतं. मुलींनाही आईसारखी साडी नेसुन स्वयंपाक करायला आणि ताईसारखा नट्टापट्टा करायला आवडतं. मात्र आता मोठे झाल्यावर पुन्हा ते बालपणीचे दिवस आठवतात आणि नकळत डोळ्यात पाणी येतं.

पाखरे जर दिवस असते
आभाळी मी सोडिले नसते
फिरूनी त्यांना ह्रदयात मी
कोंडुन ठेविले असते
ते पाखरू मागे न वळले
मन का बोलाविते पुन्हा त्या दिवसांना
जे परतुन कधी ना आले…
कुठे आहे कुठे तुझाच सोबती जुना, कळे गावातले विचार हे तुला पुन्हा
जुन्या वाटेवरी नवीन चालणे तुझे, फिरे गावातुनी जणु नवाच पाहुणा
जुने विसरायचे बरे नव्हे अरे मना, असे बदलायचे खरे नव्हे अरे मना
हसावे वाटते फिरून आजही तुला, कशी वळते नजर तुझी पहा पुन्हा पुन्हा..

आयुष्यातील हे सोनेरी दिवस कसे पटकन निघुन गेले नाही. अगदी चांदोबा मामाच्या या गाण्यासारखेच ते दिवस बघता बघता सरून गेले. उरल्या त्या फक्त आठवणी. पण…. मला पुन्हा ते दिवस जगायचे आहे. एक घास चिऊचा…एक घास काऊचा करत भरवलेला जेवणाचा घास आईच्या हातातुन खायचा आहे, मला पुन्हा शाळेत जायचंय, मित्रांबरोबर खोड्या करायच्यात, मधल्या सुट्टीत सगळ्यांबरोबर जेवणाचा डब्बा शेअर करायचाय, शाळेच्या स्नेहसंमेलनात भाग घ्यायचा आहे. पत्र्याची शिट्टी इतरांचा ओरडा पडेपर्यंत वाजवायची आहे. बायोस्कोपमधुन दिसणारी रंगबेरंगी दुनिया बघायचीय, चार आण्यात मिळणार्‍या लिमलेटच्या गोळ्या, शेंगदाण्याची चिक्की, चन्यामन्या बोरं खायची आहे, वडाच्या पारंब्यावर मनसोक्त झोके घ्यायचे आहेत, “घोटीव” पेपराच्या होड्या, विमाने बनवायची आहेत, तासन् तास रंगणारा नवा व्यापार खेळायचा आहे, चंपक, ठकठक्, चांदोबा पुस्तकांचा एका दिवसात वाचुन फडशा पाडायचा आहे. कम्प्युटर से भी तेज दिमाग असणारा चाचा चौधरी, सोबत साबूला घेउन वाचायच आहे, मॅन्ड्रेक्सच्या हातातील अंगठीचा शिक्का उठवायचा आहे. फास्टर फेणे आणि चिंगीच्या साहसी करामती पुन्हा अनुभवायच्या आहेत. साबणाच्या पाण्याचे फुगे उडवायचे आहेत. वाळुत किल्ले बनवायचे आहेत. खुप काही करायचे आहे कारण… उडणार्‍या त्या बागुलबुवाने माझे वय जरी नेले असले तरी माझे मन, जुन्या आठवणी मात्र अजुनही त्या बागुलबुवाला नेता आल्या नाही.

सौ.प्रा.अमिता निकम.
बाल मनाच्या विश्वासातल्या शिक्षिका
(M.A.M.ED sanskrut)

Related Posts

आर.आर.विद्यालयात ‘आनंददायी शनिवार’ अंतर्गत रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न
जळगाव

आर.आर.विद्यालयात ‘आनंददायी शनिवार’ अंतर्गत रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

March 7, 2026
मोशन जळगावच्या विद्यार्थ्यांची JEE Main 2026 मध्ये दणदणीत कामगिरी !
जळगाव

मोशन जळगावच्या विद्यार्थ्यांची JEE Main 2026 मध्ये दणदणीत कामगिरी !

March 7, 2026
महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!
जळगाव

महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!

March 7, 2026
लग्नसराई हंगामासाठी खुशखबर: चांदीच्या किमतीत तीन दिवसात मोठी घट
राज्य

लग्नसराई हंगामासाठी खुशखबर: चांदीच्या किमतीत तीन दिवसात मोठी घट

March 7, 2026
स्वर्गीय धनराज प्रकाश चव्हाण यांच्या पुण्यस्मरणार्थ श्रीमत देवी भागवत कथा ज्ञानयज्ञाचे आयोजन
जळगाव ग्रामीण

स्वर्गीय धनराज प्रकाश चव्हाण यांच्या पुण्यस्मरणार्थ श्रीमत देवी भागवत कथा ज्ञानयज्ञाचे आयोजन

March 7, 2026
वैद्यकीय क्षेत्राला धक्का; प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ महिलेचा मृतदेह आढळला !
क्राईम

वैद्यकीय क्षेत्राला धक्का; प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ महिलेचा मृतदेह आढळला !

March 7, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
आर.आर.विद्यालयात ‘आनंददायी शनिवार’ अंतर्गत रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

आर.आर.विद्यालयात ‘आनंददायी शनिवार’ अंतर्गत रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

March 7, 2026
मोशन जळगावच्या विद्यार्थ्यांची JEE Main 2026 मध्ये दणदणीत कामगिरी !

मोशन जळगावच्या विद्यार्थ्यांची JEE Main 2026 मध्ये दणदणीत कामगिरी !

March 7, 2026
महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!

महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!

March 7, 2026
लग्नसराई हंगामासाठी खुशखबर: चांदीच्या किमतीत तीन दिवसात मोठी घट

लग्नसराई हंगामासाठी खुशखबर: चांदीच्या किमतीत तीन दिवसात मोठी घट

March 7, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group