मेष : आज सकारात्मक विचारसरणीच्या लोकांसोबत वेळ व्यतित केल्याने तुम्हाला भावनिकदृष्ट्या सक्षम वाटेल. संपर्क क्षेत्रातही वाढ होईल. कुटुंबासोबत खरेदीचा आनंद घ्याल. घाईगडबडीत घेतलेले निर्णय बदलावे लागतील. वैयक्तिक कामासाठी वेळ मिळणार नसल्याने मन थोडे अस्वस्थ होईल. पती-पत्नीच्या नात्यात गोडवा येईल.
वृषभ : आज तुम्ही सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. भविष्यातील योजना प्रत्यक्षात आणण्याची हीच योग्य वेळ आहे. महिलांना त्यांच्या कामाची जाणीव होईल. छोट्या-छोट्या गोष्टींवर रागावल्याने घरातील वातावरण बिघडेल. त्यामुळे काळजी घ्या. अनावश्यक खर्च टाळा. गॅस आणि ॲसिडिटीच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी आहाराकडे लक्ष द्या.
मिथुन : आज सकारात्मक विचारांचा महत्त्वाचा निर्णय घेण्यास मदत होईल. चांगल्या लोकांशी संपर्क केल्याने तुमच्यामध्ये चांगले शिकण्याची शक्ती जागृत होईल. आज गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. एखाद्या विशिष्ट व्यक्तीकडून तुमची टीका निराशाजनक ठरेल. अध्यात्मिक ठिकाणी थोडा वेळ घालवल्याने तुम्हाला शांती मिळेल. व्यवसायाच्या आघाडीवर आज यश मिळणार नाही. आरोग्य चांगले राहील.
कर्क : आज जास्त धावपळ होईल. कामात यश मिळाल्याने थकवाही दूर होईल. तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. सकारात्मक ग्रहस्थितीचा फायदा घ्या. वाहनांसह यांत्रिक उपकरणांचा वापर जपून करा. निष्काळजीपणामुळे दुखापत होऊ शकते. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणी येतील. नोकरीच्या ठिकाणी पडलेली नवी जबाबदारी योग्यरित्या पार पाडू शकाल. कामाच्या व्यस्ततेत कुटुंबाकडे दुर्लक्ष करु नका.
सिंह : आज धार्मिक कार्यात तुमची रुची वाढेल. कोणतेही प्रलंबित काम पूर्ण होऊ शकते. घराच्या नुतनीकरणासंदर्भात महत्त्वाची चर्चा देखील होवू शकते. आर्थिक गुंतवणुकीबाबत अत्यंत विचारपूर्वक निर्णय घ्या. अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते. तुमच्या उपक्रमांची आणि योजनांबाबत चर्चा करू नका. वातावरणातील बदलाचा आरोग्यावर नकारात्मक परिणाम होवू शकतो.
कन्या : आज तुम्ही तुमच्या भूतकाळातील चुकांमधून धडा घेत वर्तमान चांगले बनवण्याचा विचार कराल. आर्थिक बाजू पूर्वीपेक्षा चांगली स्थितीत राहील. कुटुंबातील सदस्यांच्या छोट्या-छोट्या गोष्टींकडे लक्ष देऊन आनंद मिळवू शकता. रागावर नियंत्रण ठेवा. पती-पत्नीमध्ये चांगले सामंजस्य राहील. वातावरण बदलाचा आरोग्यावर नकारात्मक परिणाम होवू शकतो.
तूळ : आज ग्रहमान तुमच्यासाठी अनुकूल आहे. तुमच्या योजना सुरू करण्यासाठी ही चांगली वेळ आहे. घरातील ज्येष्ठांकडून योग्य मार्गदर्शन मिळू शकेल. तरुणांनाही यश मिळण्यापासून दिलासा मिळू शकतो. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. मालमत्ता आणि वाहन संबंधित व्यवसायात सुधारणा होईल. पती-पत्नीचे नाते मधुर राहील.
वृश्चिक : आजचा काळ तुमच्यासाठी अनुकूल असेल. महत्त्वाचे ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्नशील राहाल. महत्त्वाच्या मुद्द्यांवरही नातेवाईकांशी चर्चा होईल. शेजाऱ्यांशी काही प्रकारचा वाद होऊ शकतो. राजकीय कार्यात वाईट काम करणाऱ्या लोकांपासून दूर राहा. व्यवसायात अडचणी येतील.
धनु : मालमत्तेसंबंधीचा वाद आज कोणाच्या तरी मध्यस्थीने शांततेने सोडवाल. जवळच्या नातेवाईकाच्या भेटीमुळे दिलासा मिळेल. आळस आणि राग तुमच्या आयुष्यातील गोष्टी बिघडू शकतात, याची जाणीव ठेवा. खर्चावर नियंत्रण ठेवा. व्यवसाय किंवा नोकरीशी संबंधित कोणत्याही कामात शांतपणे निर्णय घ्या. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. पोटाशी संबंधित विकार जाणवतील.
मकर : अनेक दिवसांपासून रखडलेली कामे आज मेहनतीने पूर्ण होतील. राजकीय आणि सामाजिक कार्यातही तुमचे वर्चस्व राहील. मुलांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करु नका. सामाजिक उपक्रमांसोबतच आपल्या कौटुंबिक कार्याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. न्यायालयातील प्रलंबीत प्रकरणामध्ये अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. वैवाहिक जीवनात छोट्या-छोट्या गोष्टींवरून वाद होऊ शकतात. वातावरणातील बदलांचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
कुंभ : कुटुंबातील ज्येष्ठांचे आशीर्वाद तुमच्यावर राहतील. वाहन खरेदीचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी शुभ राहील. बाहेरच्या व्यक्तीशी वाद होण्याची शक्यता. चांगले काम करत रहा. विद्यार्थी पूर्णपणे करिअरवर लक्ष केंद्रित करतील.
मीन : आज तुम्ही तुमच्या कौटुंबिक संबंधित कामे पूर्ण करण्यात व्यस्त असाल. चांगल्या व्यक्तीच्या सहवासात राहिल्याने आज तुमच्या विचारात सकारात्मक बदल होईल. कोणत्याही अडचणीत कुटुंबातील सदस्यांकडून योग्य सहकार्य मिळेल. दुपारच्या वेळी अशुभ बातम्या तुम्हाला निराश करू शकतात. मनोबल खचू देऊ नका. अन्यथा, तुमच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. घर व्यवस्थित ठेवण्यासाठी तुमची मदत आवश्यक आहे. वातावरणातील बदलामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.