जळगाव मिरर । २८ ऑक्टोबर २०२५
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गौण खनिज शाखेच्या वतीने २०२५-२०२६ या वर्षासाठी १४ वाळू घाटांच्या वापर, उत्खननासाठी ई-निविदा आणि ई लिलाव प्रक्रियेची अधिसूचना जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केली आहे. सोमवारी सकाळी १०:०० वाजता ऑनलाइन नोंदणी सुरू करण्यात आली असून, १० नोव्हेंबरपर्यंत नोंदणीसाठी अर्ज करता येणार आहे.
प्रक्रियेनुसार ३० ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. तर ११ नोव्हेंबर रोजी तांत्रिक निविदा आणि १२ नोव्हेंबर रोजी आर्थिक निविदा उघडण्यात येणार आहे. अंतिम ई-लिलाव प्रक्रिया १३ नोव्हेंबर २०२५ रोजी होईल. तर निकाल १४ नोव्हेंबर रोजी घोषित केला जाणार आहे.
निविदांची नोंदणी- १० नोव्हेंबर निविदांची छाननी- ११ नोव्हेंबर निविदा उघडणार- १२ नोव्हेंबर ई-अॅक्शन प्रक्रिया- १३ नोव्हेंबर लिलावाचे अंतिम आदेश-१४ नोव्हेंबर
नदीनिहाय वाळू घाटांचा लिलाव
नदी-वाळू घाटाचे गाव
गिरणा-दोनगाव खुर्द-१, चमगाव, निंभोरे, चोरगाव व लाडली (धरणगाव).
कांग-टाकरखेडा (जामनेर). तापी-दापोरी, सावखेडा, नालखेडा, गंगापुरी, मुंगसे (अमळनेर), वाळकी,



















