
जळगाव मिरर । ९ जानेवारी २०२३
चोपडा तालुक्यातील हातेड बु. शिवारात जनावरांची अवैधरीत्या वाहतूक केल्याप्रकरणी गाडी ताब्यात घेण्यात आली असून, चालक व क्लिनरने पलायन केले आहे. या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शिरपूर ते चोपडा रोडवर दि. ७ रोजी हातेड बुद्रुकजवळ चोपड्याकडे येताना दोन किमी अंतरावर महिंद्रा बोलेरो पिकअप (एमपी०८ जीए- २०४९) वरील चालक व क्लिनर यांनी एक लाख ३५ हजार रुपये किमतीचे ९ गोहे अशी जनावरे कोंबून त्यांची वाहतूक करताना सापडले. या जनावरांचे चारही पाय त्यांना वेदना होतील, अशारीतीने जखडून बांधन गाडीत दाटीवाटीने पालथे टाकण्यात आली होती. गाडीवरील चालक व क्लिनर यांनी वाहन थांबताच वाहनातून उड्या मारून शेतशिवारात अंधारात पळून गेले.
याबाबत चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लक्ष्मण शिंगाने करीत आहेत.




















