
जळगाव मिरर । १० डिसेंबर २०२२
तालुक्यातील पाडसे येथे वाटणीच्या वादातून चौघांनी एकास मारहाण करत जखमी केले. याबाबत चारजणांविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, भागवत उत्तम कोळी (रा. पाडसे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची वडिलोपार्जित जमीन असून, त्याची वाटणी झालेली नाही. वाटणीबाबत चर्चा करण्यासाठी चुलतभाऊ हिलाल लोटन कोळी, मोतीलाल लोटन कोळी (दोन्ही रा. डांगरी), भरत चैत्राम कोळी (रा. बोरगावले, ता. चोपडा) व फिर्यादीचा भाऊ गुलाब उत्तम कोळी (रा. पाडसे) हे ७ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास शेतात जमले होते. त्यात वाटणीवरून त्यांचा वाद झाला त्यावेळी वरील लोकांनी फिर्यादीस मारहाण करून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. मोतीलाल लोटन कोळी याने मोटरीचा फ्यूज काढून डोक्यावर मारल्याने डोक्यावर जखम झाली आहे, असे फिर्यादीत नमूद केले आहे. चौघांविरुद्ध मारवड पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.




















