अमळनेर : विक्की उत्तम जाधव
शहरातील सुभाष चौक ते कुंटे रोडवरील चार टपऱ्यांना पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागल्याने हॉकर्सचे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुंटे रोडवर दहा ते बारा फुटांच्या अंतरावर असणाऱ्या हातगाड्या व टपऱ्यांना पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी अग्निशमन दलाचे नितीन खैरनार फारुख शेख, जफर खान, आनंदा झिम्बल या कर्मचाऱ्यांना दोन बंब पाठवून आग सांगितले. विझविण्यास अग्निशमन दलाने आग विझविली. मात्र, तोपर्यंत मसाले व्यापारी व कापड व्यापाऱ्याचे दुकान जळून खाक झाले होते. टप्प्याटप्प्याने अंतरावर टपऱ्या जळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याबाबत पोलिसात नोंद करण्यात आलेली नाही.