जळगाव मिरर । २० जून २०२३
शहरातील शिवाजी नगर ख्रिश्चन स्मशानभूमीजवळ दोघांनी एकास मारहाण करीत त्याच्याकडील ऐवज लूटला होता. 2022 मध्ये हा गुन्हा घडल्यानंतर या प्रकरणी जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयिताला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. युसूफ शेख उर्फ चिल्या असे अटकेतील संशयिताचे नाव आहे तर संशयिताचा साथीदार पसार झाला आहे. आरोपीकडून गुन्ह्यातील मोबाईल जप्त केल्यानंतर त्यास जळगाव शहर ोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, अकरम शेख, महेश महाजन, संदिप सावळे, विजय पाटील, प्रीतमकुमार पाटील, किरण धनगर, ईश्वर पाटील आदींनी आरोपीला अटक केली. संशयिताला एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील टोल नाका भागातून अटक करण्यात आली.