
धरणगाव : विनोद रोकडे
शहरातील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये दिनांक १ डिसेंबर ते ८ डिसेंबर या कालावधीत दत्त जयंती निमित्त अखंड नामजप यज्ञ प्रहरे गुरुचरित्र पारायण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या सप्ताह काळात अध्यात्मिक व समाजप्रबोधन पर विविध विषयांवर तज्ञांकडून मार्गदर्शन केले. सण वार व्रत वैकल्य यांची प्रात्येक्षिक मांडणी दाखवुन प्रबोधन करण्यात आले. त्यात सेंद्रिय शेती वास्तुशास्त्र आहार व आरोग्य बालसंस्कार मानवी जीवनात येणाऱ्या समस्या या संदर्भात तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले.
या काळात ३०० सेवेकऱ्यानी श्री गुरुचरित्र पारायनात सहभाग घेतला या कालावधीत सव्वा कोटी श्री स्वामी समर्थ मंत्र जप श्री स्वामी चरित्र पाठ श्री दुर्गासप्तशती पाठ मल्हारी सप्तशती तसेच विविध देवतांचे याज्ञ झाले. सत्ताहाच्या कालखंडात पालकमंत्री गुलाबराव पाटील तसेच खासदार उन्मेष पाटील तसेच तालुक्यातील १५००० पेक्षा जास्त भाविक सेवेकऱ्यानी उपस्थिती नोंदवली कार्यक्रम यशस्वीतेसाठी तालुकाप्रमुख राकेश मकवाने केंद्रप्रमुख आर पी पाटील व केंद्रातील सर्व सेवेकरी परिवारांनी सहकार्य केले.




















