
जळगाव मिरर | १० सप्टेंबर
जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील एका कंपनीत दिवसभर काम केल्यानंतर सायंकाळी घरी परतलेल्या पत्नीला पतीने स्वयंपाक करण्याच्या कारणावरून वाद घालून या वादाच्या कारणावरून त्याने हातात विडा घेऊन तिच्या उजव्या कानावर वार करून तिला लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना ८ रोजी घडली आहे. या प्रकरणी आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामेश्वर कॉलनीतील गजानन मंदिराजवळ राहणाऱ्या एका ३४ वर्षीय विवाहिता ८ सप्टेंबर रोजी सकाळी नेहमीप्रमाणे कंपनीत कामावर गेल्यानंतर सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घरी परत आल्यावर पतीने स्वयंपाक करण्याच्या कारणावरून वाद घालून पत्नीला मारहाण करून संतापाच्या भरात विळा घेऊन तिच्या कानावर विड्याने वार केले व दुखापत केले. याबाबत पतीच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस नाईक पंकज पाटील करीत आहे.




















